निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मदतीचे गाजर

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : शेतातील उत्पादित मालावर शेतकरी जगू शकत नाही, हे पाच वर्षानी या बोलघेवड्या सरकारच्या लक्षात आले.म्हणून आता शेतकर्याना दोन हजार रूपये मदतीचे गाजर दाखवले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर केली.

जोपर्यंत शेतमालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे,असे ते म्हणाले.नवेखेड येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दलाल आणि भ्रष्टाचारी यांना जगवणारे हे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.या बोलघेवड्या सरकारला पाच वर्षांनी शेतकरी आपल्या मालावर उदरनिर्वाह करू शकत नाही, असे लक्षात आले.त्यामुळे त्यांनी प्रतिवर्षी दोन हजाराचे गाजर दाखवले आहे, अशी टीका केली.साखरसम्राटांच्या भूलथापांना आणि त्यांच्या मनमानी कारभाराला भीक घालू नका, असे आवाहन त्यांनी ऊस उत्पादक शेतकर्याना केले.ऊसाचा दर हमीभावानेच घ्यायचा आहे. साखरेला उठाव नाही, खरेदीदार नाही असे म्हणणा-या सरकारला आमचे सांगणे आहे की,आमच्याकडे खरेदीदार व्यापारी आहेत.ते तीन हजार दराने एक लाख क्विंटल साखर खरेदी करतील, असे शेट्टी म्हणाले.

Previous articleनागपूर-अमरावती विभागातील नझूल जमिनी फ्री-होल्ड करण्यास मान्यता
Next articleशिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय