बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार ?
मुंबई नगरी टीम
नांदेड: देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री आहे अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेत केली.केली आहे. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट असूनही राज्यातील पाणी गुजरातला वळवायचे षढयंत्र सुरु असतानाही मुख्यमंत्री तोंडावर हात ठेवून आहेत. कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
राज्यातील २४ हजार गावे आणि १५१ तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र यावर काय उपाययोजना केल्या, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे करतात मग त्या विहिरी कुठे आहेत असा सवाल राज ठाकरे यांनी आज नांदेड येथे जालेल्या सभेत केला. राज्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याताही प्रश्न गंभीर होत चालला असताना मोदींनी जनतेला दाखवलेल्या स्वप्नाचे काय झाले असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.आज झालेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाता खरपूस समाचार घेतला. पाण्यावरुन वाद सुरू असताना महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र याविरोधात बोलण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारची नाही असे सांगून, मुख्यमंत्री हे काहीही करु शकत नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
बालाकोट घटनेवेळी वेळी आपल्या वैमानिकांना चुकीची माहिती दिली गेली, त्यानंतर अमित शाह २५० दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगितले. हे शहा यांना कसे समजले असा सवाल राज टाकरे यांनी केला. पंतप्रधान मोदींना जनतेने चांगली संधी दिली होती. पण या संधीची त्यांनी माती केली, जनतेशी ते कायम खोटंच बोलत आले असा घणाघात त्यांनी करीत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही भाजपाच्या नेत्यांनी देशद्रोही म्हणणे कमी केले नाही असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी जवानांच्या नावे कशी मते मागत आहेत यासंदर्भातली एक व्हिडिओ क्लिप प्रसारित केली.