भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी खासदार झालो

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी खासदार झालो

मुंबई नगरी टीम

मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा सामन्य कुटुंबातला तरुण लोकसभेत जाऊ शकला” अशा शब्दांत, दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बाबासाहेबांच्या विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सायन- कोळीवाडा येथील जाहीर सभेत शेवाळे बोलत होते.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, नगरसेवक राहुल कांबळे, निहाल शहा, राजश्री शिरवाडकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे राजेश शिरवाडकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी सायन- कोळीवाडा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत राहुल शेवाळे यांनी, या परिसरात केलेल्या विकासकांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पुनर्विकासाची सोडविलेली समस्या, एमयुटीपी ३ ए च्या माध्यमातून सुखद झालेला रेल्वे प्रवास, आणिक येथे उभारले जाणारे कमर्शिअल हब अशा अनेक विकासकामांची माहिती शेवाळे यांनी जनतेपुढे मांडली. “शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. देशाच्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा हवं” असेही शेवाळे म्हणाले

Previous articleमुंबईसह देशातील व्यापारी समुदाय मोदी सरकारच्या विरोधात
Next articleआदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद