विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वडेट्टीवार यांचे  अभिनंदन केले.

काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची गृहनिर्माण मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते.आज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रस्ताव ठेवला असता राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलीवडेट्टीवार यांच्या निवडीनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात त्यांचे अभिनंदन केले.विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. या जागेवर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पत्राद्वारे करण्यात आली होती.

Previous articleविधानपरिषद उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे
Next articleजलयुक्त गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी मंत्र्यांना धारेवर धरले