विधानपरिषद उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे

विधानपरिषद उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या दुस-या महिला उपसभापती ठरल्या आहेत.विधानपरिषदेत आज शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला भाजपाचे भाई गिरकर यांनी अनुमोदन दिले तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने  ही निवडणूक बिनविरोध झाली.

शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून आपला ठसा उमठावणा-या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची  बिनविरोध निवड झाली. गो-हे या विधानपरिषदेत त्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. माणिकराव ठाकरे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी  २० जुलै २०१८ रोजी उपसभापतीचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून उपसभापतिपद रिक्त होते.  उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणे अपेक्षित आहे, मात्र ही तरतूद स्थगित करण्यासंबंधी संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी आज सकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.याला काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि  जनार्दन चांदूरकर यांनी हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला देत काँग्रेसची हरकत फेटाळून लावत  निवडणूक कार्यक्रम जाहीर  केला.

Previous articleपुढे काय करायचे  ते माझ्यात  आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठरलंय
Next articleविधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार