शिक्षकांना मोठा दिलासा : यावर्षी अकरावीची संचमान्यता करण्यास स्थगिती

शिक्षकांना मोठा दिलासा : यावर्षी अकरावीची संचमान्यता करण्यास स्थगिती

मुंबई नगरी टीम

मुंबई  :  शिक्षक संख्या जास्त ठरु नये म्हणून इयत्ता अकरावी  करीता केवळ यावर्षी करीता संचमान्यता स्थगित करुन मागिल वर्षीच्या विद्यार्थी संख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावे असे निर्देश शालेय शिक्षण क्रिडा व युवक कल्याणमंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज दिले. या निर्णायमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर वर्षी शिक्षण विभागातर्फे संचमान्यता करण्यात येते त्यानुसार यावर्षी अकरावीची संचमान्यता करावी लागणार होती. यावर्षी दहावीचा निकाल पहाता संचमान्यता केल्यास शिक्षक संख्या अतिरिक्त ठरेल अशी भिती मुंबई ज्युनिअर काँलेज टीचर युनियन या शिक्षक संघटनेने व्यक्त केली होती. तसेच शिक्षक आमदारांनीही याकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री अँड आशिष शेलार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन केवळ एका वर्षा करीता संचमान्यता करण्यास स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे आता गतवर्षीच्या विद्यार्थी संख्येचा विचार करुन अनुज्ञय असलेला शिक्षकसंच ग्राह्य धरण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous articleसमाज माध्यमावरून धमक्या देणा-यांवर कारवाई करणार
Next articleआरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक