डी. एन. नगर येथिल  म्हाडाच्या पुनर्विकास कामास स्थगिती

डी. एन. नगर येथिल  म्हाडाच्या पुनर्विकास कामास स्थगिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : अंधेरीतील डी. एन. नगर येथील म्हाडामार्फत  सुरू असलेल्या पुनर्विकास बांधकाम प्रकरणात अनियमितता आढळून आली असून, या कामास तात्काळ स्थगिती देण्यात येत येवून, संबंधित म्हाडाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिले.या निर्णयामुळे वैदेही आणि रूस्तमजी विकासकास चांगला दणका बसला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालायत जाण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही गृहनिर्माण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 विधानसभेत कामकाजाच्या विशेष बैठकीत कॅांग्रेसचे सदस्य  नसीम खान यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना अंधेरी डी.एन.नगर येथिल म्हाडाकडून सुरू असलेल्या वैदेही विकासक आणि  रुस्तमजी विकासक करार पुनर्विकास  बांधकामात  अनियमितता आढळून आल्याने येथिल कामास स्थगिती देण्यात येवून,म्हाडाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  दिले. या प्रकरणी साडे तीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. तर या प्रकरणी बांधकाम विभागाने वैद्यही विकासक आणि  रुस्तमजी विकासक,महानगरपालिका अधिकारी, तसेच संबंधित अधिकारण्या विरोधात केलेली अटकेची मागणी मान्य करणार का असा प्रश्न नसीम खान यांनी केला . डी.एन.नगर येथील हे प्रकरण म्हाडाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामचे गंभीर उदाहरण असल्याचे जयंत पाटील म्हणाले . तर या दोन्ही विकासकानी रेरा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला.

अंधेरी येथील न्यू डी. एन. नगर येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्रमांक दोन ते नऊ अशा आठ इमारतीतील एकूण 480 सदनिकांचे पुनर्विकासाचे काम वैदेही आकाश हाउसिंग प्रा. लि. या विकासकाला देण्यात आले होते. या विकासकाने दोनशे व्यापाऱ्यांना जागा विकण्याचे आश्वासन देऊन पैसे उचलले होते. त्यानंतर या विकासकाने येथील पुनर्विकासाचे काम रुस्तमजी रियालिटी या बोमन इराणी यांच्या कंपनीला हस्तांतरित केले. मात्र  हस्तांतरण झाल्यानंतर रस्तमजी रियालिटी या कंपनीने दोनशे व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देत, 480 सदनिकाधारक यांचीही  फसवणूक केल्याचा नसीम खान यांनी  केला. वैदेही विकासकाला अटक करण्यात यावी तसेच रुस्तमजी रियालिटी विकासकावर  गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. संबंधित लक्षवेधी सूचना सभागृहात चौथ्यांदा आली असतानाही त्यावर कारवाई होत नाही असे सांगून,संबंधित विकासकाला सरकार का पाठीशी घालत आहे असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि  एकनाथ खडसे यांनी स्थगितीची कारवाई तात्काळ व्हावी आणि त्याची अंमलबजावणी होऊन सभागृहाला पुढील कार्यवाहीची माहिती द्यावी अशी मागणी यावेळी केली असता या मागण्याही गृनिर्माण मंत्री विखे पाटील यांनी  मान्य केल्या.

 

Previous articleमुंबई विद्यापीठात साकारणार “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर”
Next articleचार वर्षात सरकारने घेतलेले कर्ज कशासाठी वापरले याची श्वेतपत्रिका काढा