नगरपरिषद  मनपाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

नगरपरिषद  मनपाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

मुंबई नगरी टीम

मुंबई : नगरपरिषद महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्ष‍क व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिली.

सुधारित वेतन संरचनेत निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत देणे आवश्यक असून एकदा दिलेला विकल्प अंतिम राहणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विषय महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असल्याने ही महानगरपालिका वगळून राज्यातील सर्व नगरपरिषद, महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्ष‍क व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी : मुख्यमंत्री
Next articleराजू शेट्टींनी  घेतली राज ठाकरे यांची भेट