राजू शेट्टींनी  घेतली राज ठाकरे यांची भेट

राजू शेट्टींनी  घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि भेट घेतल्याची चर्चा आहे. यावेळी या दोन नेत्यांमध्ये सुमारे  दीड तास चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समजला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.राजू शेट्टी यांनी गेल्याच  महिन्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. या दोन नेत्यांच्या दुस-या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी दोन नेत्यांमध्ये सुमारे  दीड तास चर्चा झाली. सत्ताधारी भाजपा विरोधात आघाडी करण्यासंदर्भात शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या मध्ये  चर्चा झाली झाल्याचे समजते.या भेटीत ठाकरे यांच्याबरोबर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.  भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याने आज राज ठाकरे यांची भेट घेतली असे स्पष्ट करीत महाआघाडीत मनसेला घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध मावळेल अशी आशा आहे, असे शेट्टींनी या बैठकीनंतर सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी काल केली आहे.  भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले होते. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. तर कॉंग्रेसमध्ये याबाबत  मतभेद आहेत.

Previous articleनगरपरिषद  मनपाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू
Next articleग्रामविकास विभागाच्या तीन योजनांनी पटकावला “डिजीटल इंडिया अवॉर्ड”