राज्यातील ४९७ सिनेमागृहात उद्या ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार

राज्यातील ४९७ सिनेमागृहात उद्या ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार

मुंबई नगरी टीम

मुंबई  : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता ३६ जिल्हयातील ४९७ सिनेमागृहांमध्ये ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक ‘ या सिनेमाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जवळपास सव्वा दोन लाखांहून अधिक युवक वर्ग हा सिनेमा पाहू शकणार असल्याची  माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी दिली.

निलंगेकर यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यातील सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता या सिनेमाचे प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात होत असून चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटना यांनी देशप्रती असलेले कार्य मानून यास सहमती दिलेली आहे.

Previous articleधनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्या मेंढीचे वाटप
Next articleरेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन …!