२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई | ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरे शाळा खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. त्यावेळी या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Previous articleभक्तांना दिलासा : येत्या ७ ऑक्टोबर पासून मंदिरं उघडणार
Next articleभाजपचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी मंत्री जयंत पाटील सरसावले ; काय केले आवाहन ?