भक्तांना दिलासा : येत्या ७ ऑक्टोबर पासून मंदिरं उघडणार

मुंबई नगरी टीम

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटे नंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली असली तरी मंदिरे बंद ठेवल्याने विरोधकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. गणेशोत्सवानंतर राज्यात तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत होती.मात्र राज्यातील कोरोना रूग्ण संख्या घटल्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असतानाच आता सरकारने राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेवून सणासुदीच्या तोंडावर भक्तांना मोठा दिलासा दिला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

Previous articleराज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा ; दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
Next article२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार