राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा ; दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

डोंबिवली । डोंबिवलीची घटना अतिशय गंभीर आहे. या लाजिरवाणी घटनेने डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहराला काळीमा लागला आहे. कल्याण, डोंबिवली,उल्हासनगर या परिसरात गेल्या काहि दिवसात बलात्कार व विनयंभगाच्या अनेक घटना घडल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यस्था सांभाळणा-या पोलिसांचा धाक आता गुन्हेगारांवर राहिला नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहे. या घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना आता तातडीने अँक्शन प्लँन तयार करुन बलात्कार व विनयभंग आदी गुन्हेगारी कृत्ये करणा-या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज मानपाडा पोलीस स्टेशन, डोबिंवली येथे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चोरे यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील ,शशिकात कांबळे (जिल्हाध्यक्ष),नगरसेवक राहुल दामले, नगरसेवक खुशबु चौधरी, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक मोरेश्वर भोईर, पूनम पाटील, शुभा पाध्ये मंडल अध्यक्ष नंदु जोशी आदी उपस्थित होते.विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या काही महिन्यामध्ये फक्त डोंबिवलीच नाही तर कल्याण,उल्हासनगर आदी ठिकाणी बलात्कार व विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. फक्त या भागातील नव्हे तर मुंबई, पुणेसह राज्यातील माहिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी आता याप्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांचा गुन्हेगांरावरचा धाक आता कमी झाल्याचे अशा घटनांमधून दिसून येत. या परिसरात अंमली पदार्थाच्या तस्करीचे व सेवनाचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपयायोजना करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका दरेकर यांनी मांडली.

दरेकर यांनी सांगितले की, इतर राज्यातही गुन्हेगारी वाढल्याचे वक्तव्य दुदैर्वी आहे. अन्य राज्याच्या गुन्हेगारींवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी त्या राज्याचे प्रशासन घेईल. पण आपल्या राज्यातील घटना आपण नियंत्रित करण्याऐवजी व त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत ते बोलायचे सोडून दुसऱ्याकडे बोट दाखविण्याचा प्रकारावरून सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. विधीमंडळाचे विशेष अधिवेशन जर घेतले तर याविषयी विरोधी पक्षाचेही मार्गदर्शन होईल. काही सूचना असतील तर त्या मिळतील. त्यादृष्टीने सर्वंकष चर्चा होऊन उपाय निघेल. आम्हाला सरकारला धारेवर धरायचे नाही, सरकारला अडचणीत आणण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु सरकारला सूचनाही नको, अधिवेशन नको यामुळे आणखी असे किती बळी जाणार, असा सवालही दरेकर यांनी केला.

Previous articleरस्त्यांची दुर्दशा बघून मंत्री संतापले; अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश
Next articleभक्तांना दिलासा : येत्या ७ ऑक्टोबर पासून मंदिरं उघडणार