…. तोपर्यंत फेटा बांधणार नाही – खा. अमोल कोल्हे

…. तोपर्यंत फेटा बांधणार नाही – खा. अमोल कोल्हे

मुंबई नगरी टीम

अंबाजोगाई :  परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली.

जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येवून फेटा बांधेन असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस असून, परळी येथील श्री वैजनाथाचे आणि अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी मंदिरात दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेची केज विधानसभा मतदारसंघातील पहिली सभा पार पडली. भव्य मोटारसायकल रॅलीने शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले.

पक्ष बदलाचा बाजार भाजपाने सुरु केला आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केलीवेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भाजपकडून सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवार सगळं काही दिलं. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवलं नाही ते लोक पक्ष सोडून गेले आहेत असा समाचार घेतानाच त्यांच्या जाण्याने नवीनांना संधी मिळाली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. माध्यमात येणा-या गोष्टींपेक्षा जमीनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी दिली. पवारांसारखा जाणता राजा आहे शिवाय तरुण बहाद्दरांची फळी आमच्याकडे आहे त्यातून आम्ही नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला. पुरपरिस्थिती होती त्यामुळे मी शिवस्वराज्य यात्रेत नव्हतो परंतु परिस्थिती निवळल्यानंतर आलो आहे असेही आमदार  पाटील यांनी सांगितले.

Previous articleमहिलांनो, मागणारे हात होऊ नका ; स्वतः सक्षम होऊन कुटूंबाचा आधार बना 
Next articleउदय सामंत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार