शरद पवारांकडून खा. अमोल कोल्हेंची पाठराखण ! काय म्हणाले पवार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मैने गांधी को क्यों मारा या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथूराम गोडसेच्या भूमिकेवरून वादाला तोंड फुटले आहे.एकीकडे काँग्रेसकडून या चित्रपटाला प्रखर विरोध केला जात आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसे यांची भूमिका ही गोडसेचे समर्थन करणारी असल्याचे म्हटले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे.अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर ते काही गांधीविरोधक ठरत नाहीत.कलावंताकडे कलावंत म्हणूनच पाहिले पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ‘मैने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटात नथूराम गोडसेची भूमिका साकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हें यांची पाठराखण केली आहे.कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसेची भूमिका साकारली असेल तर ते काही गांधीविरोधक ठरत नाहीत.कलावंताकडे कलावंत म्हणूनच पाहिले पाहिजे असे यावेळी पवार म्हणाले.भाजपाकडून कोल्हेंवर टीका होत असल्याबद्दल पवारांनी भाजपा गांधीवादी कधी झाला असा खोचक टोलाही लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा निषेध केला आहे.दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला असून गांधींच्या मारेक-याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.या पुर्वी महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट बनविला.त्यामुळे गांधीजींचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली.त्या चित्रपटात कोणीतरी गोडसे साकारला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर काढलेल्या चित्रपटातही कोणीतरी औरंगजेबाची भूमिका केली असेल म्हणजे ती व्यक्ती काही मोगल साम्राज्याची पुरस्कर्ती होत नाही.राम आणि रावणावरील चित्रपटात कोणी रावण साकारत असेल तर ती व्यक्ती रावण होत नाही.कलावंत हा कलावंत असतो.तसेच कोल्हेंनी हा चित्रपट केला तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते.त्यांनी जर गोडसेची भूमिका केली तर ते काही गांधीविरोधक ठरत नाहीत.तो देशाचा इतिहास आहे.कलावंत म्हणून त्यांनी काम केले असे पवार म्हणाले.

Previous articleस्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
Next articleमहाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार ! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर