भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला धू धू धुतले

भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला धू धू धुतले

 मुंबई नगरी टीम

बीड :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटोदा येथे जाहीर सभा सुरु असतानाच आज  पावसाने तुफानी हजेरी लावली मात्र भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला धू धू धुतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे इथल्या जनतेने पावसात भिजत तितकाच प्रतिसाद दिला.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सातवा दिवस असून पाटोदा येथे दुसरी सभा सुरु झाली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाषण संपते ना संपते तोच पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे सभा होणार की नाही असे वाटत असतानाच  भरपावसातही खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शब्दांचे फटकारे मारत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मुसळधार कोसळत असतानाही दोघांच्या भाषणाच्यावेळी जनता मात्र जागची हलली नाहीच उलट दोन्ही नेत्यांच्या भाषणाला भर पावसात भिजत जोरदार प्रतिसाद दिला. सुरुवातीला पाटोदा शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढत राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण ,  रामकृष्ण बांगर, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, अप्पा राख , डॉ. शिवाजी राऊत , रुपेश बेदरे आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार “गणपती बाप्पा मोरयाचा” जयघोष 
Next articleसंजय दत्त करणार रासपमध्ये प्रवेश