या तारखेला लागू शकते आचारसंहिता !

या तारखेला लागू शकते आचारसंहिता !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या १० सप्टेंबरला लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १० सप्टेंबर रोजी केंद्रिय निवडणूक आयोग राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू शकते अशी शक्यता आहे. १३ ऑक्टोबर रोजी मतदान व दिवाळीपूर्वी  मतमोजणी होऊ शकेल असे जाणकारांचे मत आहे.

राज्यातील सर्वच राजकिय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. तर राज्यातील जनतेचे डोळे आचारसंहिता केव्हा लागू होणार याकडे लक्ष लागले आहे.राज्यात २०१४ च्या निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले होते.तर मतमोजणी १९ ऑक्टोबर करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीची आचारसंहिता १२ सप्टेंबरला लागू झाली होती.महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असून, आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. २०१४ च्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सवाची सांगता येत्या १२ सप्टेंबर रोजी होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने सुरक्षेवर पडणारा ताण लक्षात घेवून गणेशोत्सवाच्या आसपास निवडणुकांचा कार्यक्रम  जाहीर होवू शकतो.२५ ऑक्टोबर  पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होवू शकते.त्यामुळे येत्या १० सप्टेंबर  राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यानुसार १८ सप्टेंबर  रोजी अधिसूचना प्रसिध्द होवू शकते.तर ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी मतदान  होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

Previous article… तर त्यांना विधानसभेत पोचू देणार नाही : जयंत पाटील
Next articleमंत्रिमंडळाने घेतले तब्बल २५ महत्वाचे निर्णय