विचार करा !  नारायण राणेंना भाजपा प्रवेशासाठी किती ताटकळावे लागणार ?   

विचार करा !  नारायण राणेंना भाजपा प्रवेशासाठी किती ताटकळावे लागणार ?   

मुंबई नगरी टीम

मुंबई :  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना यापूर्वी लोक त्यांना भेटायला जायचे पण आज त्यांना मुख्यमंत्र्यांची चार-चार तास वाट पाहवी लागते असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने अजून त्यांचीच परवानगी मिळालेली नाही. मग, शिवसेना पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या परवानगीसाठी किती ताटकळावे लागणार याचा विचार करा, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल कणकवली मध्ये होती.त्यादरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले याचाच धागा पकडत केसरकर यांनी टोला लगावला.नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना लोक भेटायला जायचे पण मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी त्यांना चार चार तास वाट पहावी लागली.राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या प्रवेशासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. अजून मुख्यमंत्र्यांचीच परवानगी मिळाली नाही त्यामुळे शिवसेना पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या परवानगीसाठी किती ताटकळावे लागणार याचा विचार करा, असा टोला केसरकर यांनी लगावला.

जेव्हा नेताच हतबल असतो तेव्हा जवळ असणारे कार्यकर्ते सैरभर होतात. तशीच परिस्थिती आता राणे यांची झाली आहे. त्यामुळेच भाजपा प्रवेशासाठी ते ताटकळत राहिले आहेत, असेही केसरकर म्हणाले.कोकणातील नाणारचा प्रकल्प सध्या रद्द झाला आहे.काल काही जण मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी नाणार प्रकल्प व्हावा असे मत व्यक्त केले. तेव्हा त्यांनी यावर फेरविचार करता येऊ शकतो, असे म्हटले आहे. याचा अर्थ यावर विचार होऊ शकतो असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री जनतेमध्ये जात आहे
Next articleअनुदानासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न