शरद पवार अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल

शरद पवार अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल झाला असून,विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या सगळ्याची चौकशी ईडीतर्फे केली जाणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या सगळ्याची चौकशी ईडीतर्फे केली जाणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, शेकापचे जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षांसहसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राष्ट्रावादी काँग्रेससह काँग्रेससाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या सगळ्याची चौकशी ईडीतर्फे केली जाणार आहे.गेल्या दोन वर्षात या संदर्भातल्या  घडामोडी थंडावल्या होत्या मात्र विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच  ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले होते. त्यामध्ये अनियमितता आढळली असल्याने आता ७० जणांची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेने कर्ज वाटप केले होते. त्यामुळे या बँकेला १० हजार कोटींचे नुकसान झाले होते. या घोटाळाची व्याप्ती २५ हजार कोटींवर गेली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमण्यात आली होती.

Previous articleसातारा पोटनिवडणुकीसाठी दोन वेगवेगळी स्टिकर असेलेली मतदान यंत्रे
Next articleसंचालक नसतानाही  माझ्यावर गुन्हा दाखल : शरद पवार