शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर

शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी सत्ता स्थापनेचा तिडा कायम आहे.त्यातच शिवसेना भाजपाच्या नेत्यांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच,भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी त्यांनाच मिळणार आहे.मात्र सरकार स्थापन करण्यात भाजपाला अपयश आल्यास शिवसेना सरकार स्थापन करेल असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून,आमच्याकडे आम्हाला पाठिंबा देणारी पत्र आहेत असा दावा  त्यांनी  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून गेला असतानाही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपातील तिडा वाढत चालला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक दावा केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेवूनही भाजपाचे केवळ १०५ आमदार निवडून आले आहेत.बहुमतासाठी १४५ चा आकडा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ईडी आहे. भाजपाते नेते आज राज्यात राष्ट्रपती राजवटीची धमकी देत आहेत पण सत्ता स्थापनेसाठी पहिली संधी भाजपालाच दिली पाहिजे असे सांगतानाच भाजपाला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास शिवसेना सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवेल आणि सरकार बनवेल असा दावा त्यांनी केला. सरकार बनवण्यासाठी शिवसेनेची तयारी पूर्ण झाली असून,आम्हाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आमच्याकडे आहेत असा गौप्यस्फोट खा.राऊत यांनी केला.

Previous articleअपक्ष आमदारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Next articleआमचं ठरलंय !   अजितदादांनी केला हा खुलासा