दलित नवबौद्ध समाज राष्ट्रवादीकडे पुन्हा कसा येईल यासाठी प्रयत्न करणार

दलित नवबौद्ध समाज राष्ट्रवादीकडे पुन्हा कसा येईल यासाठी प्रयत्न करणार

मुंबई नगरी टीम

 मुंबई :  वंचितला पाठिंबा देणारा दलित,नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही हे पाहिले नाही त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. आता आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल असा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.राज्यात विधानसभेची निवडणूक झाली आहे. त्याचा निकाल संमिश्र लागला. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे हे लोकांनी लक्षात आणून दिले आहे असेही पवार म्हणाले.तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत.दिल्लीत व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर त्यानी केला अशी टिका आरो पवार यांनी यावेळी केला.माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो त्यावेळी मी स्वतः चे काम तपासून घ्यायला हवे अशी कबुली पवार यांनी दिली.या निवडणुकीत तरुणांनी पक्षाला चांगला पाठिंबा दिला आहे. मुळात यावेळी अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र काही ठिकाणी आपण मागे पडलो अशी स्पष्ट कबुलीही पवार यांनी दिली.

समाजातील जो गरीब वर्ग आहे तो वंचितच्या मागे उभा राहिला. लोकसभेत पाठिशी राहिला.त्यामुळे ती ताकद दिसून आली मात्र जो मुस्लिम समाज वंचितच्या पाठिशी राहिला तो विधानसभेत मुस्लिम समाज बाजुला गेला तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला असे पवार यांनी सांगितले.इगतपुरी येथे आदिवासी समाज पाड्यात गेलो असता  तिथे सत्ताधाऱ्यांबद्द्ल राग पाहायला मिळाला असा किस्सा सांगतानाच या सर्वांना संघटीत करावे लागणार आहे. त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास दिला पाहिजे असे काम आपल्याला करायचे आहे असे  पवार म्हणाले. ज्या  ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे.काही ठिकाणी संघटनात्मक काम कमी पडले त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत  तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे तिथे नव्याने संधी दिली पाहिजे त्यावेळी तो जोमाने काम करेल असेही  पवार म्हणाले.

मागासवर्गीय समाजाच्या ठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे.मुंबई, ठाणे याठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता एकच जागा मुंबईत आली आहे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या.महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे हे लक्षात आणुन देवुया असे आवाहन शेवटी पवार यांनी केले.

Previous articleतीन दिवसात पंचनामे पूर्ण करा : मुख्यमंत्री
Next articleपक्ष सोडून गेलेले आज माघारी येऊ का म्हणायला लागलेत : अजित पवार