विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाचे उद्या अधिवेशन सुरू होत असून,विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना आज राजभवनावर शपथ दिली.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना आज राजभवनावर शपथ दिली.हंगामी अध्यक्ष म्हणून ते अधिवेशनात भूमिका बजावतील.भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना आज राजभवनावर शपथ दिली. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावे आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते.

Previous articleकाँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
Next articleउद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री