सरकारमध्ये “या” नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

सरकारमध्ये “या” नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई : उद्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागणार याची राज्यातील जनतेला उत्सुक्ता आहे. या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत  राष्ट्रवादीचे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

 शिवतीर्थावर उद्या गुरुवारी सायंकाळी होणा-या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पहिले सदस्य ठरणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. आज सायंकाळी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत  मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत  राष्ट्रवादीचे अजित पवार आणि जयंत पाटील तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे.ठाकरे सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस आणि मित्र पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार याची चर्चा सुरू आहे. तर ठाकरे सरकारमध्ये कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खालील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना- एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,उदय सामंत,सुनील प्रभू,अनिल परब,गुलाबराव पाटील,दीपक केसरकर,तानाजी सावंत,गोपीकिशन बाजोरिया ,संजय राठोड,आशिष जायस्वाल, शंभुराजे देसाई

राष्ट्रवादी- अजित पवार,जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,नवाब मलिक,राजेश टोपे,अनिल देशमुख,धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड

काँग्रेस- अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार,सतेज पाटील,यशोमती ठाकूर के. सी. पाडवी,विश्वजित कदम,सुनील केदार,नितीन राऊत, नाना पटोले,वर्षा गायकवाड

मित्र पक्षाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी प्रहार संघटनेने बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Previous article“या वारकरी” दाम्पत्यासह ४०० शेतकरी शपथविधीला उपस्थित राहणार
Next articleनव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केवळ राष्ट्रवादीचाच;अध्यक्षपद काँग्रेसकडे