नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केवळ राष्ट्रवादीचाच;अध्यक्षपद काँग्रेसकडे

नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केवळ राष्ट्रवादीचाच;अध्यक्षपद काँग्रेसकडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपद असेल अशी चर्चा होती मात्र नव्या सरकारमध्ये केवळ एकच राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार आहे.तर विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या उद्या होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाची कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ आणि इतर संबंधीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात तिन्ही पक्षाचे किती सदस्य असावे. महामंडळाचे वाटप विधानपरिषदावरील नेमणूका आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत सर्व बाबींवर अंतिम चर्चा करण्यात आली असल्याची माहिती पटेल यांनी दिली. नव्या सरकारमध्ये केवळ राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार आहे.तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याबाबत एकतम झाल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांचे एक किंवा दोन मंत्री शपथ घेतील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत विश्वासदर्शक संमत करण्यात येईल. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर
३ डिसेंबरनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

Previous articleसरकारमध्ये “या” नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता
Next articleस्टँपपेपरवर लिहून देतो.. हे सरकार पाच वर्षे टिकणार