सहा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान

सहा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : मिनी विधानसभा निवडणुका म्हणून समजल्या जाणा-या राज्यातील नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आज पार पडल्या,प्राथमिक अंदाजानुसार या निवडणुकीसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषद आणि ४४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले.पालघर वगळता अन्य पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा १९ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आली होती. पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा १७ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आली होती. सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा होत्या.जिल्हा परिषदनिहाय झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार टक्केवारी अशी: नागपूर- ६७, अकोला- ६३, वाशीम- ५७, धुळे- ६५, नंदुरबार- ६५ आणि पालघर- ६३. एकूण सरसरी- ६३.

Previous articleजनतेची कामे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीत दर महिन्याला जनता दरबार: उदय सामंत
Next articleदेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे “साथ साथ”