भाजप मनसे एकत्रित येण्याचा विचार नाही : फडणवीस

भाजप मनसे एकत्रित येण्याचा विचार नाही : फडणवीस

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच हि शक्यता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे.मनसेने आपली कार्यपध्दती बदलली तरच भविष्यात याचा विचार होवू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हे दोन पक्ष भविष्यात एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच हि शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे.सध्या तरी भाजप आणि मनसे एकत्रित येण्याचा कोणताही विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.मनसेने आपली कार्यपध्दती बदलली तरच याचा भविष्यात विचार केला जावू शकतो असेही त्यांनी सांगितले.भाजप हा व्यापक विचार करणारा राष्ट्रीय पक्ष आहे.मनसे आणि आमच्या विचारसरणीत मोठा फरक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत आज भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. जिल्हा परिषद निवडणुकांचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध नव्हता असे त्यांनी सांगून,नागपूरात भाजपाच्या झालेल्या पराभव त्यांनी मान्य केला. नागपूर आणि पालघरमध्ये भाजपाची पिछेहाट झाली मात्र मोठा पराभव झाला नसल्याचे ते म्हणाले.गेले वेळे पेक्षा नागपूरात भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. पालघरमध्येही काही जागा कमी झाल्याचे त्यांनी मान्य केले.जिल्हा परिषदेत पक्षाची पिछेहाट झाली असली तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित येवूनही भाजपने चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.दुस-याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटायचे असे या तिन्ही पक्षांचे चालले अशी टीका करून आता त्यांनी पेढे वाटणे बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous articleमुलीच्या बनावट पासपोर्टमुळे एजाज लकडावाला पोलीसांच्या जाळ्यात
Next articleपोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे निलंबीत