विजय वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खाते

विजय वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खाते

मुंबई नगरी टीम

मुंबई : खातेवाटपात इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण अशी खाती मिळाल्याने नाराज असलेले विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खाते हे त्यांना देण्यात आल्याने अखेर त्यांनी आज पदभार स्वीकारला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने नाराज असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खाते हे सोपविण्यात आल्याने त्यांची नाराज दूर झाली आहे. आज त्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला.यापूर्वी त्यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण हि खाती देण्यात आली होती. आता त्यांना खार जमीन विकास, भूकंप पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत.नाराज असलेल्या वडेट्टीवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती.तर बुधवारी झालेल्या एकदिवसीय अधिवेशनाकडेही ते फिरकले नव्हते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी समजूत काढल्यावरही वडेट्टीवार यांची नाराजी कायम होती. हट्टावर कायम होते.शिवसेनेने त्यांच्याकडे असलेले आणि मंत्री संजय राठोड यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खाते वडेट्टीवार यांच्याकडे दिले आहे.

मदत आणि पुर्नवसन खाते शिवसेनेकडे गेल्यामुळे मी नाराज होतो.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आलेले खाते शिवसेनेकडे गेले होते. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खाते आहे. हे खाते शिवसेनेकडे गेल्याने आपण नाराज होते.माझे काही कौटुंबिक काम असल्याकारणाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची परवानगी घेवून अधिवेशनाला हजर राहिलो नाही.विधानसभा निकालानंतरही मला कुटुंबाला वेळ देता आला नव्हता,त्यामुळे मी कुटुंबासोबत होतो, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Previous articleकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती
Next articleउतणार नाही मातणार नाही,जनसेवेचा वारसा सोडणार नाही : धनंजय मुंडे