दगडानं दगडाला  आणि तलवारीला तलवारीनं उत्तर : राज ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : सीएए आणि एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनी मनसेचा आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्याने राहावे,नाही तर यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ,असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आझाद मैदानात झालेल्या सभेत दिला.पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने विराट मोर्चा काढण्यातहोता .पक्षाची भूमिका आणि झेंडा बदलल्यानंतर पहिल्याच शक्तीप्रदर्शनात मनसेने आपली ताकद दाखवून दिली.

पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना भारताबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मनसेचे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा चले जाव मोर्चा काढण्यात आला होता.शिवसेनेने राज्यातील महाविकास आघाडीला साथ दिल्याने मनसेने हिंदुत्वाच्या मुद्दाला हात घालत पक्षाची भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला.राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडा पुढे करीत शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. आज हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढत मनसेने आपली ताकद दाखवून दिली.राज ठाकरे यांच्यासह त्यांचे संपूर्ण ठाकरे कुटुंब या मोर्चात सहभागी झाले होते.हिंदु जिमखाना येथून सुरू झालेल्या चले जाव मोर्चाचे रूपांतर आझाद मैदानावर सभेत झाले.यावेळी केलेल्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबत केंद्रातील सरकारला पाठिंबा देत या कायद्याचे समर्थन केले.

आपल्या देशात हिंदू,दलित आणि आदिवासी आहेत.ते इथलेच आहेत,त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे.मात्र पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे.राज्य सरकारला सांगून उपयोग नाही.त्यामुळे केंद्राला सांगतो,माझ्या मुंबईतील पोलिसांना दोन दिवस मोकळीक द्या,ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील.असे सांगतानाच या कायद्याविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्याने राहावे.नाही तर यापुढे पुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.बाहेरून आलेल्या लोकांनामुळे बॉम्बस्फोट,दंगली होत आहे.मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही, असेही ते म्हणाले.

पोलिसांवर हात टाकायची यांची हिंमत होती.आता यांच्यावर हात टाकायला किती वेळ लागेल असा सवाल राज ठाकरे यांनी केला.रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला त्यावेळी त्याठिकाणी बांगलादेशी व्यक्तीचा पासपोर्ट सापडला.फक्त बांगलादेशातून दोन कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणाहून किती घुसखोर आले असतील याची काहीच माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो.मात्र आज परदेशातील मौलवी मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी येतात,त्याठिकाणी त्यांचे काय षडयंत्र सुरु आहे याची काही माहित नाही.याबाबतची माहिती गृहखात्याला देणार असे सांगून, ही माहिती पोलीस खात्यातूनच मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.देशात अनेक बॉम्बस्फोट झाले.त्यामध्ये अनेक माणसे मारली गेली.या सर्व बॉम्बस्फोटामागे कोण होते ? बॉम्बस्फोट झाले. हे सर्व बॉम्बस्फोट दाऊदने केले.त्याच दाऊदला आज पाकिस्तान सांभाळत आहे.माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का असा सवाल उपस्थित करून कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसेच घुसखोरीवरचे संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे  असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे  यांनी भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांना भगिनींनो.. या वाक्याने पुन्हा एकदा मा.राजसाहेबांचा भाषणाला सुरुवात.

अनेकांना CAA, NRC म्हणजे काय हे माहीत ही नाही. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत.

देशभरात मुसलमानांनी जे मोर्चे काढले,त्याचा अर्थ मला लागला नाही.. जे जन्मापासून इथे राहतात त्यांना कोण बाहेर काढणार? तसं कायद्यात नव्हतं तर ताकद कुणाला दाखवली,काय म्हणून दाखवली?

 सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ..अरे मधलं काही आहे की नाही? ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.

जेव्हा केंद्र सरकारकडून चुकीची गोष्ट घडली तेव्हा टीका केली पण जेव्हा सरकारने चांगले निर्णय घेतले तेव्हा सरकारचं अभिनंदन देखील केलं. मग ३७० कलम हटवणं असो, मंत्रिमंडळातर्फे राम मंदिर ट्रस्ट निर्माण करण्याचा निर्णय झाला त्याचंही अभिनंदन केलं. 

आज पाकिस्तानची जी परिस्थिती आहे,दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे तो देश..आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले ,त्याच्या मागे कोण होत? मुंबईत बॉम्बब्लास्ट झाले, दाऊदने केले त्याला सांभाळलं कोणी? तर पाकिस्तानने.

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे.पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूवर अत्याचार होतात. ज्या हिंदूंवर धार्मिक अत्याचार होतात त्यांना भारताने नागरिकत्व देणं गैर काय? मग म्हटलं जातं तिथल्या मुसलमानांनाही घ्या, का घ्यायचं?

माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली का ह्या लोकांना? या देशात अनेक प्रश्न आहेत, पण बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा पण प्रश्न आहे… प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका भारताने घेतला नाही.

जिथे मराठी मुसलमान आहेत तिथे दंगली होत नाहीत, जिथे बाहेरून येत आहेत तिथेच गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी देखील वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. ते ड्रग विकतात, मुलींची छेड काढतात..पोलीस आत जाऊ शकत नाही..नुसतं बघत बसायचं षंढासारखं.

एक जागा आहे तिथे परदेशातील मुल्ला आणि मौलवी येत आहेत, तिथे जे घडते ते चांगलं नाही हे मला पोलिसांकडून कळलं…मग बॉम्ब स्फोट झाले की आपण मेणबत्त्या काढतो, आता सतर्क राहायला नको का?

 या राज्य सरकारला सांगून उपयोग नाही, केंद्राला सांगितलं पाहिजे..पोलिसांना हात सोडून मुभा द्या ४८ तास ते काम करून दाखवतील..पण त्याचे हात बांधले गेले आहेत.

२०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.

आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका. जो देशप्रेमी मुस्लिम आहे त्याने जागृत राहिले पाहीजे.

 

 

Previous articleमा.ना. एकनाथजी शिंदे ( नगरविकास मंत्री) साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Next articleधनंजय मुंडेंमुळे मिळाला “त्या” वीरपत्नीला  न्याय !