ठाकरे सरकार पडल्यास भाजपा सरकार स्थापण्याचा दावा करणार नाही

मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा आणि जनतेचा विश्वासघात केला असून,हे महाआघाडीचे सरकार आपसातील मतभेदामुळे आपोआपच पडणार आहे असा दावा करतानाच मध्यावधी निवडणुकांमध्ये जनादेशाचा अनादर करणाऱ्या सर्व पक्षांना जनताच धडा शिकवेल आणि भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.त्यासाठी आम्ही काही करण्याची गरज नाही.मात्र हे सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष देखील सरकार स्थापन करणार नाही. त्यामुळेच मध्यावधी निवडणुका अटळ आहेत असे ते म्हणाले.

दुसऱ्यांदा भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पाटील म्हणाले की, काल नवी मुंबई येथे भाजपाचे दोन दिवसांचे प्रदेश अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात दोन ठराव करण्यात आले.त्यातील पहिला ठराव हा शिवसेनेने केलेल्या विश्वासघाताचा व जनतेच्या प्रेमाचा अनादर केल्याबद्दलचा होता.भाजपने शिवसेनेसोबत निवडणुका लढवल्या होत्या.त्यामुळे साहजिकच निकालानंतर आम्ही त्यांच्या समवेत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होतो. जर भाजपाची साथ नसती तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्याच नसत्या असे पाटील म्हणाले .राष्ट्रवादी व काँग्रेसला विरोधी बाजूलाच बसण्याचा जनादेश मिळालेला होता. मात्र त्यांनी भाजपाची सत्ता चोरली आणि त्यांना शिवसेनेने साथ दिली.सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेबरोबर पुन्हा सरकारमध्ये जाण्याचा प्रश्नच संपला. यापुढे महाआघाडीचे सरकार अंतर्गत विरोधाने कोसळेल असा दावा करतानाच सरकार कोसळल्यानंतर भाजपा सरकारमध्ये जाईल असे कोणी समजू नये आम्ही नकार दिल्यानंतर विधानसभा भंग होईल आणि मध्यावधी निवडणुकीला समारे जावे लागेल असे त्यांनी सांगितले जीवनात काही घटना घडतात त्यातून धडा घेऊन आपण पुढे जातो यापुढे केवळ मध्यावधी निवडणुका हाच पर्याय असेल. त्यादृष्टीने एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कऱण्याचा ठराव कालच्या अधिवेशनात आम्ही केला आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर भाजपाचे कार्यकर्ते दिवसभर धरणे धरतील आणि जनतेला शेतकऱ्यांच्या फसवणुकी संदर्भात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा जो बोजवारा आघाडी सरकारने उडवला आहे .त्या संदर्भात दिवसभर माहिती देतील जनप्रबोधन करतील .

Previous articleठाकरे सरकारच्या विरोधात भाजपा राज्यभर जनजागृती करणार
Next articleनक्की ठाकरे सरकार कोण चालवतंय ?