नक्की ठाकरे सरकार कोण चालवतंय ?

मुंबई नगरी टीम
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक सांगत आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असताना पुन्हा एसआयटी कशाला,नक्की कोण चालवतंय ठाकरे सरकार,उध्दव ठाकरे, शरद पवार की राहुल गांधी ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असला तरी याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपाचे माजी खासदार सोमय्या यांनी टीका केली आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच घेतलेल्या तिन्ही पक्षांतील मंत्र्यामध्ये आणि पक्षांतच मतभेद दिसून येत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणातील तपासातही हे अधोरेखित होत आहे. याचा तपास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एनआयएकडे दिला असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाराजीमुळे एसआयटी तपासणी का ? अशीच शक्यता यामुळे उपस्थित होत आहे असे माजी खासदार सोमय्या म्हणाले.

Previous articleठाकरे सरकार पडल्यास भाजपा सरकार स्थापण्याचा दावा करणार नाही
Next articleफडणवीसांचे आव्हान स्वीकारण्यास तयार : अस्लम शेख