जिल्हा परिषदा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि इतर निवडणूका लवकरच होणार असून त्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत मंत्र्यांना सुचना करण्यात आल्या.शिवाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका कशा लढवता येतील याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा जाहीरनाम्यात जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर अंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे जबाबदारी सोपवली आहे.त्यावर उपाय योजना करण्यात यावी यावरही चर्चा झाली.तर एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव बाबत जे पत्र दिले होते.त्याची बैठक झाल्यानंतर दोन तासाच्या आत एनआयएकडे केस वर्ग केली.कायदेशीररित्या ती केस त्यांना देणे बंधनकारक आहे. तो निर्णय झाला असला तरी कलम १० मध्ये तरतुद आहे की, समांतर चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतची प्रक्रिया पुर्ण करुन पवार  यांना माहिती दिली.शरद पवार यांचा जो आग्रह होता तो ते पुर्ण करतील असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

एनपीआर हे डाटा कलेक्शन आहे ते आधारच्या माध्यमातून झालेले आहे.एनपीआर म्हणजे जे सेन्सेस आहे त्यामध्ये अतिरिक्त प्रश्नावली केंद्र सरकारने टाकलेली आहे. त्याबाबतीत इतर राज्यांनी कोणती भूमिका घेतली आहे. त्याबाबतीत काही माहिती नाही मात्र राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित बसून कुठली प्रश्नावली टाकावयाची आहे याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेणार आहे. सेन्सेसचा कार्यक्रम ठरलेला आहे.त्याबाबतची तयारी झाली आहे मात्र प्रश्नावली अजून ठरलेली नाही. त्यावर तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Previous articleहिंमत असेल तर फडणवीसांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी
Next articleभीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार