अखेर महापोर्टल बंद; फडणवीसांच्या निर्णयाला ठाकरे सरकारचा दणका

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयला दणका दिला आहे.ब आणि क गटांच्या पदभरतीची परिक्षा घेण्यात येणारे महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.आता या गटाच्या परिक्षा घेण्यासाठी सेवा देणा-या संस्थेंची सूची तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.त्यामुळे यापुढील परिक्षा या नव्या संस्थेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापुर्वीच्या फडणवीस सरकारचा अजून एक निर्णय राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य शासनाच्या सर्व प्रसासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यात येत होती. या महापरिक्षा पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच हे महापरिक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.हे महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आज तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.महाआयटीकडे ऑफलाईन पध्दतीन चाचणी, टेकलेखन आदी परिक्षा घेण्याकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे महापरिक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ब आणि क गटाच्या पदभरतीची परिक्षा राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.अशा सेवा देणा-या संस्थांची सूची करण्याची कार्यवाही महाआयटी मार्फत करण्यात यईल. त्यानुसार सूचूमधील निवड झालेल्या कंपन्याकडून संबंधित विभागाच्या परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे.जाहिरात ते निवड प्रक्रिया या प्रक्रीयेचे नियोजन संबंधित विभागाच्या स्तरावर होणार आहे.ज्या परिक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या संबंधित विभागांना स्रव आवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

Previous articleमहाराष्ट्र उद्योजकांचे आवडते गुंतवणूक केंद्र : आदित्य ठाकरे
Next articleमहिलांवरील अत्याचार आणि शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार : फडणवीस