होय आम्ही शिवसेनेला फसवलं,भाजपची स्पष्ट कबूली

मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जे ठरले होते. त्यावरून या दोन पक्षात रणसंग्राम होवून शिवसेना आणि भाजपात कोडीमोड झाली. मात्र शिवसेनेला दिलेला शब्द शेवटपर्यंत मान्य न करणा-या भाजपाने आज आपली चुक झाल्याची स्पष्ट कबुली दिली.होय आम्ही शिवसेनेला फसवलं,आमची चूक झाली.आमच्या चुकीच्या निर्णयाचा फायदा तुम्हाला झाला.एक ना एक दिवस आम्ही आमची चूक सुधारू असे सांगतानाच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळावा अशी जाहीर मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. तर असे आमच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काहीच ठरले नव्हते असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,भाजप अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले होते त्यापासून भाजपने फारकत घेतल्याने राज्यात राजकीय वादळ निर्माण होवून या दोन पक्षांमधील असलेली युती तुटली होती.त्यानंतर राज्यात अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रथमच या दोन पक्षामध्ये जे काही ठरले होते. त्यांची स्पष्ट कबूली भाजपाने आज दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत वक्तव्य करीत भाजपला घरचा आहेर दिला आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना टोला लगावताना या घटनेतील सत्यच समोर आणले.होय आम्ही शिवसेनेला फसवलं,ती आमची चूक झाली. आमच्या चुकीच्या निर्णयाचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू असे सांगत मुनगंटीवार यांनी भाजपचा खोटेपणाच सभागृहासमोर आणला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्याची मैत्री असेल, पण आमची मैत्री ३० वर्षांपासूनची जुनी आहे.यावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून म्हणून तुम्ही फसवलं, असे प्रतित्युत्तर मुनगंटीवार यांनी देण्यात आले. हो आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली,पण आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेतला असा टोमणा काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावताना आम्ही आमची चूक एक दिवस सुधारू. एखादा जोतिरादित्य शिंदे आमच्याकडे पुढील काळात येईल, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

Previous articleदहशतवादी संघटनेकडून मुंबई बाग आंदोलनाला फंडिग: दरेकरांचा गौप्यस्फोट
Next articleकोरोना खबरदारी : यात्रा,सामूदायिक,शासकीय कार्यक्रम रद्द