राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत तब्बल ४० हजार वाहने जप्त

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १९एप्रिल या कालावधीत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नुसार या नियमाचे उल्लंघन करणा-या एकूण ५७ हजार ५१७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर १२, हजार १२३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात अवैद्य वाहतूक करणारे ४० हजार ४१४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

राज्यात कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर क्रमांकावर ७३ हजार ३४४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा  शिक्का मारला आहे  अशा ५७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ५१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.तर परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. २२ मार्च ते १९एप्रिल या कालावधीत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नुसार या नियमाचे उल्लंघन करणा-या एकूण ५७ हजार ५१७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर १२, हजार १२३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात अवैद्य वाहतूक करणारे ४० हजार ४१४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ११ पोलीस अधिकारी व ३८ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या ११७ घटनांची नोंद  झाली असून  यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Previous articleधक्कादायक : मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण
Next articleपालघर  हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या : प्रविण दरेकर