मुंबई नगरी टीम
मुंबई : गो..करोना गो..असा नारा देणारे केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना नवीन कविता केली आहे. “बुद्धाने चीनला शिकविली करूणा,पण चीन मधून कसा आला इथे कोरोना”,या शब्दात त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत कविता करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठीतील कविता
बुद्धाने चीनला शिकविली करूणा
पण चीन मधून कसा आला इथे कोरोना
भारतातून बौद्ध धम्म चीन मध्ये गेला
आणि चीन बुद्धमय झाला
पण आता चीन कोरोनामय झाला
कोरोना च्या तोंडावर आपण लावूया ताला
कोरोना चा साफ करून टाकूया आपण गंदा नाला
मी तर आहे जय महाराष्ट्र जय भारत जय भीम वाला
मग इथे कसा आला रे हा गद्दार साला
फेकून देऊया आपण गटारात कोरोनाची भयंकर माला
कोरोनाच्या पोटात घुसवून टाकूया आपण धारदार भाला
मनामध्ये सर्वांनीच ठरवा
आणि कोरोना ला आहे तिथेच हरवा
आपले अंगण स्वच्छ सारवा
आणि कोरोनाला हाटवा
त्या झाडावरून ओरडतो आहे कोरोनाचा पारवा
त्याची अचूक शिकार करायची ठरवा
लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना पोटभर घास भरवा
पण कोरोनाला जरूर हारवा
जास्त करू नका घरामध्ये गारवा
आणि घराच्या बाहेर काढू नका गर्दीचा करावा !
चला हवा येऊ द्या
पण कोरोनाला लवकर जाऊ द्या
कोरोना मुर्दाबाद चा नारा मला देऊ द्या
कोरोनाचा बदला मला घेऊ द्या
आपणच व्हा आपले रक्षक
कोरोनाचे होऊ नका भक्षक
हिंदी कविता
कोरोना ने सारे दुनिया को घेर लिया है
भारतने कोरोना को सही उत्तर दिया है
कोरोना ने सारे मानवजाती को परेशान किया है
इस लिये सारे मानव जाती ने कोरोना की तरफ ध्यान दिया है
सारे दुनिया मे कोरोना ने हाहाकार मचाया है
लेकिन लॉक डाऊन ने भारत को बचाया है
यहा नाच रहा है कोरोना
लेकिन इसमें तुम मत हारोना
कोरोना को मत डरोना
कोरोना को जलदी मारोना
सभी लोगोंको जगांना है
कोरोना को इधर से भागांना है
सॅनिटायझर और मास्क मंगाना है
घर घर वालोंको जागांना है !
किरोना की बहुत खतरनाक है जात
मत मिलावो एक दुसरे के हात मे हात
नही तो कोरोना से तुम्हारा हो जयेगा घात
अगर करनी है तुम्हे कोरोना पर मात
तो दे दो मा. नरेंद्र मोदीजी को साथ
कोरोना की ये है अंधेरी रात
मत पुछो एक दुसरे को अपनी जात!