खुशखबर : ८ जूनपासून खासगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई : लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यास  सुरुवात करण्यात केली असून, येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे. खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचा-यांच्या हजेरीत सुरू करता येवू शकतील असे या आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमधून आता काही प्रमाणात शिथीलता देण्यास सुरूवात केली आहे.राज्य सरकारने आज एक आदेश जारी करीत येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे.अशी कार्यालये सूरू करताना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असे या आदेशात म्हटले आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागेल.आपली कार्यालये सुरू करताना कंपनीला कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा लागणार.अशा कार्यालयातून कर्मचारी घरी परतल्यानंतर कोणालाही लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

येत्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.त्याच बरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालय,शैक्षणिक संस्थांचे कार्यालयाचेही कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये केवळ शिकवण्याचे काम करणारे कर्मचारी यांना वगळून इतर कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे,उत्तरपत्रिका तपासणे आणि निकालाचे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

३ जूनपासून खालील सूट लागू होणार

 प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी

गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना

सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती ५ टक्के होती

ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी

शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई

५ जूनपासून खालील सूट

मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार

 कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार

दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे

खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना

अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई

 खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते

८ जूनपासून खालील बाबींमध्ये सूट

सर्व खाजगी कार्यालये १० टक्के उपस्थिती अथवा १० लोकांच्या उपस्थितीत जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने चालवण्यास परवानगी

 उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय

कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना

अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी १ चालक १ प्रवासी, रिक्षा १ चालक २ प्रवासी, खाजगी चारचाकी १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी

उर्वरित राज्यात

परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही

खुली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत

 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही

 जिल्हा अंतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यास परवानगी

सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी

गर्दी आढळल्यास मात्र बंद करण्याचा इशारा

शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार

मेट्रो बंद राहणार,स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

Previous articleठाकरे सरकार मधील दुस-या मंत्र्याची कोरोनावर मात
Next articleराज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित