एमआयडीसीतील उद्योगांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे.

एमआयडीसी सेवा देत असलेल्या उद्योगांक़डून प्रिमियम रक्कम,हस्तांतर शुल्क, अतिरिक्त प्रिमियम, पोटभाडे शुल्क आकारले जाते. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि उद्योगांना हे शुल्क भरणे शक्य झाले नाही. अशा उद्योगांना ही रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांना रक्कम भरणे शक्य झाले नाही, त्यांच्याकडून विलंबशुल्क वसूल केले जाणार नाही.याशिवाय ज्या भूखंडाचा विकास कालावधी, वाढीव विकास कालावधी लॉकडाऊनच्या कालावधीत संपलेला आहे, अशांनादेखील सवलत मिळणार आहे. यासंबधीचा कालावधी वाढविण्याचा अधिकारी संबधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

Previous articleसहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या
Next articleपरीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे : मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी