ठाकरे सरकार मधील अजून एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाकरे सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्यायमंत्री  घनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली,त्यानंतर आज राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला   काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये  खव -खव होत होती,त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना  तपासणी केली व काल रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मी तात्काळ मुबंई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आहे अशी माहिती खुद्द बनसोडे यांनी दिली आहे.

मागील तीन महिन्यापासून कोरणाच्या काळामध्ये उदगीर मतदारसंघात व लातूर जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना, प्रत्येक कंटेनमेंट झोन मध्ये पाहनि करणे हॉस्पिटलची पाहणी करणे, व्यवस्थापन पाहणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, या व अशा अनेक कामानिमित्त पळापळ करत असताना व मतदारसंघातील मंत्रालयात काही कामे प्रलंबित असल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत असताना, अनावधानाने कुणाच्या तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला   काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये  खव -खव होत होती, त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना  तपासणी केली व काल रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मी तात्काळ मुबंई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आहे ,येथील सर्व टीम माझ्यावर लक्ष ठेवून उपचार करत आहेत . मागील चार दिवसांमध्ये माझा अनेक लोकांशी संपर्क आला असल्यामुळे जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्या सर्वांना माझी विनंती आहे आपण स्वतः होम क्वारंटाईन व्हावे उदगीर, लातूर,उस्मानाबाद येथे बैठका घेतल्या होत्या तेथील सुद्धा अधिकारी व कार्यकर्ते यांनी पण होम कोरणटाईन व्हावे व काही त्रास वाटल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Previous article…तरच सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल पुन्हा सुरु होणार !
Next articleमाजी मंत्री पंकजा मुंडेंच्या वाढदिवशीच कार्यकर्त्याने मुलीचे नाव ठेवले “पंकजा”