माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या वाढदिवशीच कार्यकर्त्याने मुलीचे नाव ठेवले “पंकजा”

मुंबई नगरी टीम

बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नेतृत्व सर्व सामान्यांमध्ये किती लोकप्रिय आहे,याचा प्रत्यय अनुभवास आला. पंकजा मुंडे यांचा काल वाढदिवस होता.एका कार्यकर्त्याने त्याच्या कन्येचे ‘पंकजा’ असे नामकरण करून त्यांचा अनोखा वाढदिवस साजरा केला.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा २६ जूलै हा वाढदिवस.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कुणीही भेटायला न येता आरोग्याची काळजी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. ताईंचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी मोठा दिवस असतो.ताईंच्या एका कार्यकर्त्याला काल कन्यारत्न झाले. मग काय, त्याने त्या चिमुकलीचे नाव ठेवले “पंकजा” आणि ताईंनीही तीला खास आशीर्वादही दिलेत. केरबा पाटील केंद्रे गोलेगांवकर हे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहे.सरपंच असलेल्या केरबा पाटील यांना काल कन्यारत्न झाले. आपल्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी कन्यारत्न झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. मग  त्यांनी आपल्या मुलीचे नाव पंकजा असे ठेवले. केरबा पाटील यांनी या चिमुकलीचा फोटो ट्विट करत पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पंकजा मुंडें यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होत तिला आशीर्वादही दिलेत.’शुभेच्छांसाठी धन्यवाद आणि छोट्या पंकजाला आशीर्वाद’ असे त्यांनी  ट्विट केले आहे.पंकजा मुंडे यांच्या या ट्विटमुळे केरबा यांच कुटूंब भारावून गेले आहे.

Previous articleठाकरे सरकार मधील अजून एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण
Next articleदिलासा : शिष्यवृत्तीच्या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही