दोन वर्षानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते.सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे,मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले.

येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून,गेली दोन वर्षे डॉ बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे.राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleपवारांचे सर्व आयुष्य आग लावण्यात गेलं ! सदाभाऊ खोतांच्या टीकेला राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर
Next articleपहाटेचे सरकार गेल्याने भाजपची सत्तेसाठी तडफड ; ठाकरे सरकार भक्कम,कार्यकाळ पूर्ण करणार