बाप्पा पावले : गणेशभक्तांना  प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारने अखेर कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणा-या चाकरमान्यांना दिलासा दिला आहे.गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना १२ ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणे आवश्यक असून, त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.जे चाकरमानी एसटीने प्रवास करतील त्यांना ई-पासची आवश्यकता असणार नाही,असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्टपासून एसटी बसेस नेहमीच्या बसस्थानकातून  सोडण्यात येणार असून त्यांचे प्रचलित तिकीट दरात,आगाऊ आरक्षण आज मध्यरात्रीपासून ( ४ ऑगस्ट) सुरू होत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.तसेच गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना १२ ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणे आवश्यक असून, त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जे चाकरमानी एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना त्यांना ई-पासची आवश्यकता असणार नाही.मात्र,प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.संबंधित प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे ( २३ऑगस्ट पासून येण्यासाठी )आगाऊ आरक्षण देखील करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली.

 करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन एसटी बसेस येत्या ५ ऑगस्टपासुन १२ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत असून आज मध्यरात्रीपासून (४ ऑगस्ट) या बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे ) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसेच, सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त  कुठेही थांबणार नाहीत.या बरोबरच ग्रुप बुकिंग(गट आरक्षण) करणाऱ्या प्रतिनिधींनी जवळच्या आगारात आरक्षणासाठी संपर्क साधावा. त्यांना देखील केवळ २२ प्रवशांचे  नेहमीचे एकेरी तिकीट दर आकारुन त्यांच्या कोकणातील गावापर्यंत थेट बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Previous articleहे तर गलिच्छ राजकारण ; पण मी संयम बाळगलाय!
Next articleखूशखबर : महावितरण मध्ये ७ हजार जागांसाठी भरती होणार