ट्विटरच्या क्षितिजावर सामंतांचा ‘उदय’;कोकणच्या नेतेपदावर केला शिक्कामोर्तब

मुंबई नगरी टीम

मुंबई । आपल्या बेधडक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.ट्विटरच्या सर्व्हेत कोकणातील नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्सची संख्या असलेले नेते म्हणून सामंत हे अव्वल ठरले आहेत.मोठ्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे त्यांनी कोकणातील अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे.ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे एकप्रकारे कोकणच्या नेतेपदावर मंत्री उदय सामंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा प्रभावी वापर करीत भाजपने कॅाग्रेसला नामोहरन केले होते.प्रथमच भाजपने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर समाज माध्यमांना मोठे महत्व आले होते.समाज माध्यमांमध्ये ट्विटर हे सर्वांधिक पसंतीचे माध्यम म्हणून ओळखले जात आहे.एखादा नेता किंवा अभिनेता हा समाजात किती प्रसिद्ध आहे हे समाज माध्यमावरील फॉलोअर्सच्या संख्येवरून ठरवले जाते.कोकणातील विविध पक्षांचे नेते आणि त्यांचे समाज माध्यमातील असणारे फॉलोअर्स यांच्या आकड्यावर नजर टाकली असता कोकणातील नेत्यांमध्ये भल्याभल्या नेत्यांना पिछाडीवर टाकीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत अव्वल ठरले आहेत.आजच्या घडीला कोकणातील नेत्यांमध्ये सर्वांत जास्त फॉलोअर्स मंत्री सामंत यांचे आहेत.मंत्री उदय सामंत यांचे ट्विटरवर एकूण १ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत.तर त्यांच्या पाठोपाठ राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे फॉलोअर्स आहेत.त्यांचे एकूण १ लाख ६४ हजार फॉलोअर्स आहेत.राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांचा कोकणातील नेत्यांमध्ये फॉलोअर्सच्या संख्येत तिसरा क्रमांक लागतो.त्यांचे ट्विटरवर एकूण १ लाख ४३ हजार फॉलोअर्स आहेत.कोकणातील नेत्यांमध्ये सर्वाधिक कमी फॉलोअर्स असलेले नेते म्हणून भाजपचे माजी आमदार विनय नातू हे ठरले आहेत.त्यांची ट्विटरवरील केवळ १८ एवढी आहे.

सध्या ट्विटरच्या माध्यमातून सतत विरोधकांवर प्रहार करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांचे ट्विटरवर ८२ हजार तर भाजपचे आमदार नितेश राणे यांचे १ लाख २८ हजार ९०० फॉलोअर्स आहेत.खुद्द माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे ६१ हजार फॉलोअर्स आहेत.शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचे एकूण ६ हजार ७६० फॉलोअर्स आहेत.राज्याचे परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे २४ हजार १०० तर माजी मंत्री रामदास कदम यांचे १९ हजार ८०० फॉलोअर्स आहेत.भाजपचे माजी आमदार बाळासाहेब माने यांचे केवळ ३२ फॉलोअर्स आहेत.म्हाडाचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी बेधडक निर्णय घेणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे उदय सामंत यांच्या ट्विटर खात्यावरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढून ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सची संख्या असणारे सामंत हे कोकणातील लोकप्रिय नेते ठरले आहेत.एक प्रकारे कोकणच्या नेतेपदावर मंत्री उदय सामंत यांच्या नावावर ट्विटरने शिक्कामोर्तब केल्याची चर्चा कोकणातील जनतेमध्ये आहे.

कोकणातील ट्विटर सर्व्हेनुसार कोकणातील नेते आणि त्यांची फॉलोअर्सची संख्या पुढील प्रमाणे

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत- १ लाख ८० हजार
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे- १ लाख ६४ हजार २००
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे- १ लाख ४३ हजार
भाजप आमदार नितेश राणे- १ लाख २८ हजार ९००
माजी खासदार निलेश राणे- ८२ हजार ४००
भाजप खासदार नारायण राणे- ६१ हजार
भाजप आमदार प्रसाद लाड- ६४ हजार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक- ३० हजार १००
भाजप आमदार निरंजन डावखरे – २२ हजार २००
शिवसेना आमदार भास्कर जाधव- १० हजार ४००
भाजप आमदार रवींद्र चव्हाण – ४ हजार ९२५
शिवसेना खासदार विनायक राऊत ६ हजार ७६०
शिवसेना आमदार राजन साळवी -३ हजार ९०३
शिवसेना आमदार वैभव नाईक- ३ हजार २१९
शिवसेना आमदार दीपक केसरकर -३ हजार ४१
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम- १ हजार १२१
राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे- ४ हजार ६१७
शिवसेना आमदार योगेश कदम- ३ हजार ७००
भाजप आमदार संजय केळकर ४५९
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब माने- ३२
परिवहनमंत्री, पालकमंत्री रत्नागिरी अनिल परब – २४ हजार १००
माजी मंत्री रामदास कदम- १९ हजार ८००
माजी आमदार विनय नातू -१८
राजन तेली -५९

Previous articleकाँग्रेसचा स्वबळाचा नारा,विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल
Next articleप्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी ;२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !