लवकरच एक युवा नेता सीबीआयसमोर हजर राहण्याची शक्यता !

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण आता सीबीआयकडे गेले असून, त्याचा तपास देखील सूरू झाला आहे. यामध्ये भाजपकडून सातत्याने काही टिप्पणी केल्या जात आहेत.असे असताना भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी एक सुचक विधान करत सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे. एक युवा नेता स्वतः सीबीआयसमोर न बोलवता हजर राहू शकतो,अशी शक्यता नाखुआ यांनी व्यक्त केली आहे.

सुरेश नाखुआ यांनी काही विश्वासू सुत्रांनी माहिती दिल्याचे म्हणत याबाबत ट्वीट केले आहे. “एक युवा नेता स्वतः सीबीआयसमोर न बोलवता जाऊ शकतो. आज किंवा उद्या हा नेता चौकशीसाठी हजर राहू शकतो”. मोठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्लॅन आखला जात असल्याचे नाखुआ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकारणासह सर्वच स्तरातून आता कुजबुज सुरू झाली आहे. हा नेता स्वतःची इमेज वाचवण्यासाठी असे पाऊल उचलण्याची शक्यता असल्याचे या ट्वीटच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरेश नाखुआ यांनी केलेले हे विधान नेमके कोणाच्या दिशेने इशारा करतात हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कोणत्याही नेत्याच्या नावाचा उल्लेख नाही. तर सुशांत प्रकरणात प्रत्यक्षरित्या कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव समोर आलेले नाही. मात्र भाजप नेत्यांकडून नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नाखुआ यांच्या ट्वीटमध्ये जर तथ्य असेल तर तो युवा नेता कोण आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमाजी आमदार अनिल गोटेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल !
Next articleआता बास..मोबाईलवर वाजणारी कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा