मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला विचारला जाब

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला जाब विचारला.तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात आले पण आरक्षणाला स्थगिती आदेश देण्यात आला नाही ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत,याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावे अशी मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती नंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून,ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केली जात आहेत तर हाच मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.याबाबत मराठीतून बोलताना मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या अडचणीची त्यांनी सभागृहाला माहिती दिली.मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने महाराष्ट्रातील तरुण-तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे,कारण मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.देशात आजवर अशा प्रकारे आरक्षणाला स्थगिती देण्याची ही पहिलीच घटना आहे.तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात आले पण या आरक्षणाला स्थगिती आदेश देण्यात आले नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत,याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.या स्थगितीमुळे मराठा समाजाचे शिक्षण,नोकऱ्या आदी सर्वच आघाड्यांवरील प्रश्न अडकून राहिले आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी सभागृहात मांडली.

Previous articleऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही
Next articleसरकारच्या नाकावर टिचून मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, केला लोकलने प्रवास