ही देखील अफवाच! खडसेंच्या राष्ट्र्वादीतील प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य 

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत ही अफवा असल्याचे म्हटले आहे.याधीही देखील त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाला असल्याने ही देखील अफवाच आहे. एकनाथ खडसे अशी कोणतीच भूमिका घेणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे वृत्त समोर आले आहे. यावर भाष्य करत चंद्रकांत पाटलांनी या वृत्ताचे खंडन केले.एकनाथ खडसे अशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत.ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचे नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत.याधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा होत्या त्या अफवा ठरल्या आहेत. ही देखील अफवाच आहे, असे चंद्रकांत पाटल यांनी म्हटले.

दरम्यान,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीवरून अनेक तर्कवितर्क काढण्यात आले.एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी माहिती समोर आली. मात्र एकनाथ खडसे यांच्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.जळगाव सिंचन प्रकल्पबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे.

Previous articleशरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Next articleराजकारण विसरून माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या कारखान्यासाठी धावले धनंजय मुंडे!