राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली.या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थितीत होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये तब्बल दोन चर्चा झाली,या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली मात्र हे वृत्त वा-यासारखे पसरताच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी ही भेट झाल्याचे कबूल केले, आणि भेटी मागची कारणे स्पष्ट केली. परंतु या भेटीमुळे राज्यातील वातावरण कमालीचे ढवळून निघाले असतानाच  राज्यातील महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आला असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली.या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थितीत होते.या तिन्ही नेत्यांमध्ये सुमार तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

आज या तिन्ही नेत्यांमधील बैठकीविषयी कसलीही अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी कालच फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे.फडणवीस आणि राऊत यांनी ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी असल्याचा खुलासा केला असतानाच लगेच पवार,ठाकरे आणि थोरात यांच्या भेटीमुळे  महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Previous articleसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक; अनेक चर्चांना उधाण
Next articleदेवेंद्र फडणवीस हे आमचे कायमचे शत्रू नाहीत : संजय राऊतांचे मोठे वक्तव्य