१५ ऑक्टोंबरपासून शाळा  सुरू होणार ; मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्या नंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोंबरपासून शाळा उघडणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मात्र विद्यार्थ्यांना शाळेत हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर मोठ्या वर्गाच्या आणि नंतर हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. शाळा सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना या (SOP)  या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायच्या आहेत. सोशल सामाजिक अंतर पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने  स्पष्ट केले आहे. शाळेमध्ये दिला जाणारा मध्यान आहार स्वच्छ आणि सुरक्षित आहे किंवा नाही याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांवर सोपविण्यात आली आहे.पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना शाळेत दररोज हजर रहावेच लागेल असे नाही त्यासाठी हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे.

Previous articleरेमडेसिवीर इंजेक्शन कुठेच मिळत नाही ? तुम्हाला गरजेचे आहे,तर या हेल्पलाईनवर करा फोन
Next articleतरच.. गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याची हिंमत करावी