सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही :शंभूराज देसाई 

मुंबई नगरी टीम

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.साता-यात या प्रकरणी आंबेडकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले असतानाच या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. ‘एक राजा तर बिनडोक आहे.दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत अशी जहरी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेली टीका निंदनीय आहे.अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नाही असे सांगतानाच सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामिण ) शंभूराज देसाई ठणकावले आहे.खासदार उदयनराजे भोसलें वरील टीका सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता ही सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.उदयनराजे भोसले यांच्यावरील टीकेनंतर साता-यातील त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.साताऱ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे भोसले जिंदाबाद,प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी  केली.तर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध परळीत सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये असे या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.

Previous articleराज्य शिखर बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चीट
Next articleमुंबईत १६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा; व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती