“नारायण राणे” नावाचा दबदबा कायम, सत्ता असो की नसो

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर केले आहे. मंत्रिमंडळाकडून याला मान्यता मिळाली असून त्याचा शासकीय आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. या मंजुरीचे श्रेय शिवसेना घेत असून यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नारायण राणे” नावाचा दबदबा सत्ता असो की नसो, असे म्हणत नितेश राणेंनी कोकणातील राणेंच्या वर्चस्वाविषयी आठवण करून दिली आहे.

“नारायण राणे” या नावाचा दबदबा सत्ता असो की नसो.. सिंधुदुर्गच्या राजकीय प्रवासात १९९० पासुन कोणच थांबवू शकले नाही. या तर प्रकल्प राणेंच्या माध्यमातुन होतात किवा त्यांच्या मुळे केले जातात. शेवटी सगळे काही एकाच व्यक्तिमुळे! माझा नेता लय पॉवरफुल!”, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात झालेले शासकीय मेडिकल कॉलेज राणेंमुळेच झाल्याचे नितेश यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी होती.या वैद्यकीय कॉलेजमुळे जिल्ह्यात सुसज्ज अत्याधुनिक रुग्णालय मिळणार होते.या अनुषंगाने मंत्रिमंडळाने मेडिकल कॉलेजला मान्यता दिली असून त्याचा जीआर जारी करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्द केले.

Previous articleअन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल !
Next articleमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही