अर्णब गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का ? : अनिल परब

मुंबई नगरी टीम

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या अटकेवरून भाजपने ठाकरे सरकारवर राज्यात आणीबाणी लादल्याचा आरोप केल्यानंतर भाजपच्या या आरोपपास जशासतसे उत्तर शिवसेनेने दिले आहे.गोस्वामीला झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.गोस्वामीने अन्वय नाईक या व्यवसायिकाचे पैसे बुडवल्याने नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली आहे.मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करता आहे असे सांगून,गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का ? असा सवाल राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज त्यांच्या घरातून अलिबाग पोलीसांनी अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे.या प्रकरणी भाजपने राज्य सरकारवर हल्ला चढवित ठाकरे सरकार राज्यात आणीबाणी लादत असल्याची टीका केली आहे.तर भाजपच्या या टीकेला शिवसेनेने प्रतुत्तर दिले आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावत भाजपवर हल्ला चढवला आहे.गोस्वामींनी अन्वय नाईक यांचे पैसे बुडवल्याने आर्थिक समस्येतून नाईक यांनी आत्महत्या केली.त्यामुळे गोस्वामीला झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. एका मराठी भगिनीचे कुंकू गोस्वामींमुळे पुसले गेले.मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत असे सांगतानच, गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का ? असा सवाल परब यांनी केला आहे. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूने आहेत का ? असतील तर त्यांनी तसे जाहीर करावे, असेही परब म्हणाले.

दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीनेही भाजपवर हल्ला चढवला आहे.अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बचावासाठी केलेल्या वक्तव्याचा मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या बाजुने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील तर या देशाने मान्य करायचे का भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत असे ट्वीट करुन मलिक यांनी भाजपाला चांगलेच पेचात पकडले आहे.

Previous articleसेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड जाणार; मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Next articleखूशखबर : आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड ; ५७.५६ कोटी रुपये वितरीत